माळशिरसचे तहसीलदार यांना धनगर समाजाच्यावतीने आरक्षण अंमलबजावणी बाबत निवेदन
धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, समाज बांधवांची संतप्त प्रतिक्रिया
माळशिरस (बारामती झटका)
आपल्या राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्त्वात आहे. डोंगरदऱ्यात राहणारे, भटकंती करुन उपजिवीका भागवणारे धनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहेत. कित्येक पिढ्या ही मागासलेपणाची झळ सोसत आहेत. भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिलंय. मात्र, गेल्या ७० वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली. आज तुमच्या हाती धनगर उद्धाराची संधी आहे. धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले. जिल्ह्यांपासून ते गाव खेड्यांपर्यंत आंदोलनाचे लोण परसले होते. या अनुषंगाने आपण एक बैठक घेतली. या बैठकीत धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठीचे पुरावे मांडले. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार माळशिरस यांना देण्यात आले. यावेळी सकल धनगर समाज बांधव उपस्थित होते. या निवेदनामध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा. अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत (याचिका क्र. ४९१९/२०१७) ॲड. कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करणे. तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करणे. मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी. तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणुक करणे.
‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही, त्याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करणे. मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देणे तसेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिकी प्रति हेक्टर एक रूपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे.
बिरोबा मंदिर देवस्थानाच्या (१)श्री बिरोबा देवस्थान, आरेवाडी ता. कवठेमहांकाळ, २)श्री महालिंगराया देवस्थान, हुलजंती ता. मंगळवेढा, ३) श्री बिरोबा देवस्थान, हुन्नूर ता. मंगळवेढा, ४)श्री विठ्ठल बिरट्रैव देवस्थान, पट्टणकोडोली ता. हातकणंगले, ५) श्री वाशी अवघडखान देवस्थान, वाशी ता. करवीर) या मुळ स्थानांच्या सर्वांगिण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविधासाठी आणि सुशोभिकरणासाठी २०० कोटी रूपयांचा निधी द्यावा.महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने ताब्यात घेऊन किल्ले वाफगाव विकास आराखडा त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी,
ज्या पद्धतीने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव करण्यासाठी तात्काळ व ठोस पाऊले उचलण्यात आली त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे,यावर आपण प्रतिसाद दिला. धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी समिती ही नेमली. आरक्षण अंमलबजावणीसाठी ५० दिवसांचा वेळ मागितला.आज आपण दिलेल्या मुदतीचे ५० दिवस पुर्ण झाले आहेत. मात्र, धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासकीय पातळींवर साधं पानही हललं नाही. ही अत्यंतिक खेदाची बाब आहे. राज्य प्रमुख म्हणून आपण मुख्यमंत्री पदी आहात. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या प्रत्येक व्यकीला ‘राजधर्म’ पाळावा लागतो, मुख्यमंत्री कोणत्याही विशिष्ट समुहाचे नसतात, ते सर्वांचे असतात, सर्वसमावेशक असतात, एका विशिष्ट समुदायासाठी आपण खास प्रयत्न करता, धनगर आरक्षणाकडे उदासीनता दाखवता. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. आपण तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक मार्गाने चालणाऱ्या तीव्र लढ्याला सामोर जाण्याची तयारी ठेवावी. असा इशारा देण्यात आला यावेळी नागेश वाघमोडे बाळासाहेब सरगर मनसे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे माजी सरपंच तुकाराम देशमुख नगरसेवक सचिन वावरे शरद कर्णवर ज्ञानेश्वर तरंगे राहुल लवटे विकास नारनवर अक्षय वाघमोडे शंकर काळे पाटील दादा साहेब हुलगे हनुमंत टेळे राजेंद्र शिंदे विठ्ठल पालवे अमोल शिंदे तुषार कोळेकर महेश बर्वे अमर गडदे अजय गडदे लक्ष्मीकांत वाघे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
That is very interesting, You’re an overly skilled blogger. I have joined your rss feed and look forward to looking for extra of your magnificent post. Additionally, I have shared your site in my social networks!
I cling on to listening to the news bulletin lecture about receiving boundless online grant applications so I have been looking around for the most excellent site to get one. Could you advise me please, where could i find some?
As soon as I found this website I went on reddit to share some of the love with them.
Great post. I am facing a couple of these problems.
Thanks for another excellent article. The place else may anyone get that kind of information in such an ideal approach of writing? I have a presentation next week, and I’m at the search for such info.
Wow! This could be one particular of the most helpful blogs We’ve ever arrive across on this subject. Basically Excellent. I am also a specialist in this topic therefore I can understand your hard work.
Hi there just wanted to give you a quick heads up and let you know a few of the pictures aren’t loading properly. I’m not sure why but I think its a linking issue. I’ve tried it in two different internet browsers and both show the same outcome.
My husband and i got very joyful when Raymond managed to complete his reports through the ideas he got while using the blog. It is now and again perplexing just to happen to be giving freely facts that many many others have been making money from. We do know we now have the blog owner to appreciate for that. Those explanations you’ve made, the easy web site menu, the friendships you will aid to engender – it’s got all extraordinary, and it’s really facilitating our son and us reckon that the subject is fun, which is tremendously fundamental. Thanks for the whole thing!
Please let me know if you’re looking for a article writer for your weblog. You have some really great posts and I think I would be a good asset. If you ever want to take some of the load off, I’d absolutely love to write some material for your blog in exchange for a link back to mine. Please blast me an email if interested. Cheers!
Thank you, I have recently been looking for info about this subject for a while and yours is the best I have found out so far. But, what in regards to the bottom line? Are you positive concerning the supply?