ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले….

भारतीय जनता पार्टीचे पिलीव जिल्हा परिषद गटात श्री. चंद्रकांत जाधव, पिलीव पंचायत समिती गणात सौ. नम्रता पुकळे, लवंग पंचायत समिती गणात सौ. ऋतुजा पराडे पाटील यांचा दैदीप्यमान विजय….

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कमळ डौलाने फुलले आहे. भारतीय जनता पार्टीचे पिलीव जिल्हा परिषद गटात श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव, पिलीव पंचायत समिती गणात नम्रता शिवराज पुकळे, लवंग पंचायत समिती गणात ऋतुजा विक्रम पराडे पाटील यांचा दैदिप्यमान विजय झालेला आहे…

माळशिरस तालुक्याच्या इतिहासात प्रथमच मोहिते पाटील व जानकर गट एकत्र येऊन महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार, शिवसेना एकनाथ शिंदे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, यांच्यासह शेतकरी संघटना व इतर छोटे-मोठे पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधात लढलेले होते.

माजी आमदार राम सातपुते यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सत्तर वर्षाच्या प्रलंबित व जाणीवपूर्वक विकासापासून कोसो दूर ठेवलेल्या जनतेच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढलेला होता. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मोहिते पाटील यांनी आम्ही लक्ष देतो असे म्हटल्याने तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी पूर्व भागात जास्त लक्ष दिलेले नव्हते. त्यामुळे गत विधानसभेला माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातून मताधिक्य मिळालेले होते. मात्र, माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातून मताधिक्य न मिळाल्याने निसटता पराभव झालेला होता.

माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीनंतर माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या वीज, पाणी, रस्ते अशा समस्या सोडवून जनतेच्या संपर्कात होते. याचाच परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत. तर काही ठिकाणी विजयाच्या जवळ येऊन ठेपलेले आहेत. जिल्हा परिषद गटामध्ये पिलीव, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, कोळेगाव, फळवणी अशी गावी आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव व पंचायत समिती सदस्या सौ. नम्रता शिवराज पुकळे यांचा दैदीप्यमान विजय झालेला आहे तर तांदळवाडी पंचायत समिती गणातील सौ. वैशाली किसन फुलारे यांचा अल्पमताने निसटता पराभव झालेला आहे. माळीनगर जिल्हा परिषद गटातील लवंग पंचायत समिती गणात सौ. ऋतुजा विक्रम पराडे पाटील यांचा दैदीप्यमान विजय झालेला आहे. लवंग पंचायत समिती गणात लवंग, तांबवे, गणेशगाव, वाघोली, संगम, बाभुळगाव, वाफेगाव अशी गावे आहेत. मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये भारतीय जनता पार्टीने लक्षणीय मताधिक्य घेतलेले आहे. युवा नेते विक्रम उर्फ सोनू पराडे पाटील यांचा जनसंपर्क उपयोगी आलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती सूर्यकांत दादा माने देशमुख यांचे चिरंजीव अमृतभैय्या माने देशमुख यांनी वेळापूर पंचायत समिती गणात विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या धर्मपत्नी सौ. विमल जानकर यांच्या विरोधात भरपूर मताधिक्य घेऊन निसटता पराभव अमृतभैय्या यांचा झालेला आहे.

अशा अनेक माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मताधिक्यामध्ये वाढ झालेली आहे. भविष्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या विकास कार्यातून माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाप्रमाणे पूर्व भाग होईल, अशी भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान नेते व कार्यकर्त्यांमधून आत्मविश्वास निर्माण झालेला आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button