ताज्या बातम्याराजकारण

उद्या आला नाहीस तर तिथं येऊन हाय-पाय तोडेन..! खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांची उपअभियंत्यास धमकी

मोहिते पाटील यांच्या राजकारणात तीन पिढ्या मुस्लिम समाज पाठीशी आहे मात्र, धैर्यशील यांनी अश्लील शिवीगाळ करून आमचा उद्धार केला; मुस्लिम समाजाच्या भावना आहे…

सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील तर कॉन्ट्रॅक्टर स्वर्गीय उदयसिंह मोहिते पाटील हे समीकरण चालत होतं, मगं अधिकारी बाप असला म्हणून मुलगा कॉन्ट्रॅक्टर होऊ नये का ? असा सवाल उपस्थित होत आहे…

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माळशिरस पंचायत समितीमधील उपअभियंता इस्माईल मुलाणी यांच्यातील संभाषणाची क्लीप शनिवारी समाज माध्यमावर व्हायरल झाली. ‘उद्या आला नाहीस तर हात-पाय तोडेन’, अशी धमकी खासदार मोहिते-पाटील यांनी दिल्याचे दिसून येत आहे.

माळशिरस पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपअभियंता इस्माईल मुलाणी यांच्यासोबत कामावरून वाद झाला होता. या वादावरून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

ऑडिओ क्लीपमधील संभाषण
पीए : खासदार धैर्यशील मोहिते-पाटील बोलणार आहेत. देतो साहेबांकडे

अधिकारी : नमस्कार भैय्यासाहेब

मोहिते-पाटील : शिवराजला पाठवतोय उद्या तुझ्याकडं. ते सगळं तयार करायचं आणि माझ्याकडं यायचं.

अधिकारी : मी सोलापूरला आहे.

मोहिते-पाटील : (शिवी) घेउन यायचं सकाळी. समजलं ना. नाहीतर तिथं येऊन हात-पाय तोडीन पंचायत समितीत. समजलं का ? पुन्हा शिवी***, ऐकू येतय का तुला?

अधिकारी: मी सोलापूरला आहे.

मोहिते-पाटील : उद्या सकाळी सांगायलोय मी तुला. नाही आला तर याद राख मी तुला दाखवतो.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या राजकारणापासून आज तिसऱ्या पिढीपर्यंत मोहिते पाटील यांच्या राजकारणात मुस्लिम समाज पाठीशी आहे. मात्र धैर्यशील यांनी अश्लील शिवीगाळ करून आमचा उद्धार केला, अशा मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना आहेत.

प्रतिकूल परिस्थितीत रोड मिस्तरी मस्टर कारकून पासून इस्माईल मुलाणी यांना नोकरीचा खडतर प्रवास करून रिक्त जागी सिनेरिटीने प्रभारी उपअभियंता पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. मुलगा शिक्षण घेऊन कॉन्ट्रॅक्टर झालेला आहे. योगायोगाने वडील प्रभारी उप अभियंता व मुलगा ठेकेदार आहे. याचा विपर्यास मोहिते पाटील यांचे बगलबच्चे व समर्थक वेगळ्या पद्धतीने करीत आहेत. जेणेकरून शिवीगाळ व दमकी दिलेले वेगळे कारण व समाजासमोर दुसरे कारण दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न आहे.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील असताना त्यांचे बंधू शिवरत्न कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा स्वर्गीय उदयसिंह मोहिते पाटील हेही कॉन्ट्रॅक्टर होतेच. विजयदादा मंत्री नाहीत तरीसुद्धा आजही शिवरत्न कन्स्ट्रक्शन सुरू आहे. मोठे बंधू मंत्री आणि लहान बंधू कॉन्ट्रॅक्टर असे होतेच ना, मग वडील अधिकारी व मुलगा ठेकेदार हेच का मोहिते पाटील यांच्या बगलबच्च्यांना आठवत आहे. क्लिक वायरल यामुळे धैर्यशील यांची भाषाशैली व बोलण्याची पद्धत समाज माध्यमावर पाहिली पुढे काही घडू नये, यासाठी अधिकाऱ्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे. अधिकारी व त्यांचे कुटुंब दडपणामध्ये आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी समाज माध्यमावर सदरच्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कोणाची दादागिरी व गुंडगिरी चालू देणार नाही असा इशारा दिलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button