ताज्या बातम्यासामाजिक
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती (बारामती झटका)
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी उपविभागीय कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे यांच्यासह उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

तहसील कार्यालयात अभिवादन
तहसिलदार स्वप्नील रावडे यांनी केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



