भाजपचे उपनगराध्यक्ष तानाजीराव नवनाथ भगत यांचा मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सन्मान केला..

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना दे धक्का….
अकलूज (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघातील माढा विधानसभा मतदार संघात माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात असणारी महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष रिक्तपदी बिनविरोध नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष श्री. तानाजीराव नवनाथ भगत यांचा माढा लोकसभेचे कार्य तत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी शासकीय विश्रामगृह अकलूज येथे सन्मान केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम अध्यक्ष श्री. गणेशजी चिवटे, श्रीपूर नगरपंचायतीचे गटनेते राहुलआप्पा रेडे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील, युवा नगरसेवक विक्रमसिंह लाटे पाटील, नगरसेवक निनाद पटवर्धन, नगरसेवक मोहसीन पठाण, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, नगरसेवक प्रकाश नवगिरे, नगराध्यक्षपती अशोकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते मौलाभाई पठाण, उद्योजक अमरसिंह पिसाळ देशमुख, महाळुंग विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दादासाहेब लाटे पाटील, ज्येष्ठ नेते शिवादादा रेडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये असताना सुद्धा अपक्ष नगरसेवक यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने दंड थोपटणारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विचाराचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष श्री. तानाजीराव भगत यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष करण्यामध्ये माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा असल्याने मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना दे धक्का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



