ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माजी आमदार राम सातपुते यांनी स्व. सौ. चांगुणा साठे यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्त अभिवादन…

महाराष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मातोश्री सौ. चांगुणा साठे यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न..

अकलूज (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी महाराष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. चांगुणा तानाजी साठे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अकलूज येथील निवासस्थानी स्वर्गीय चांगुणा साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेवरावजी कावळे, अकलूज नगर परिषदेचे गटनेते नगरसेवक राहुल लोंढे, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे अकलूज शहराध्यक्ष किसनशेठ शिंदे, भाजपचे युवा नेते किरण उर्फ बाबा गायकवाड, भाजपचे अकलूज शहर उपाध्यक्ष सचिन घोडके, अकलूज शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष जतीन वायदंडे, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील, साठे परिवारातील किरण साठे अनिल साठे सुनील साठे, सतीश अडगळे, साईराज आडगळे आदी उपस्थित होते.

लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन राजकारणा पलीकडे मैत्री जपत असतात. वेळात वेळ काढून महाराष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे आणि साठे परिवार अकलूज यांच्या दुःखामध्ये सहभागी झालेले होते….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button