जिल्हा बँक निवडणुकीसाठी खटावमध्ये संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग!

मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बोराटवाडीत ठराव बैठक; जबाबदाऱ्या व निवडणूक नियोजनावर खल
सातारा (बारामती झटका)
बोराटवाडी, ता. माण, दि. १८ सप्टेंबर २०२६ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची संघटनात्मक ताकद एकवटण्यासाठी बोराटवाडी येथे महत्त्वपूर्ण ठराव बैठक पार पडली. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ठोस नियोजनावर चर्चा करण्यात आली.
बैठकीत संघटनात्मक जबाबदाऱ्या, मतदान प्रक्रिया, मतदार प्रतिनिधींशी समन्वय आणि पुढील निवडणूक नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करत निवडणुकीच्या मैदानात प्रभावीपणे संघटन उभे करण्याचे आवाहन मंत्री गोरे यांनी केले.

खटाव तालुक्यातील सहकारी संस्थांचे चेअरमन, मतदान प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती या बैठकीचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीपासून प्रभावी संपर्क आणि नियोजनावर भर देण्यात आला.
यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार धैर्यशील कदम, युवा नेते विक्रमशील कदम, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुरज शिवाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, तसेच सी. एम. पाटील, राजेंद्र घाडगे, मानाजी काका घाडगे, मोहन पाटील, सागरभाऊ साळुंखे, शिवाजी शेडगे, उपसभापती श्रीमंत पाटील, चंद्रकांत देशमुख (जायगावकर), विकास जाधव, सोमनाथ भोसले, विशाल बागल यांच्यासह खटाव तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे चेअरमन, मतदान प्रतिनिधी व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील संघटनात्मक हालचालींना वेग आला असून, मतदान प्रतिनिधींच्या समन्वयातून पुढील रणनीती आखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



