ताज्या बातम्याराजकारण

मोहिते पाटील यांच्या राजकारणाचा घडा पलटला; रणजितसिंहांच्या भेटीगाठी पालथ्या घड्यावर पाणी – राजकीय वर्तुळात चर्चा

शिवरत्न बंगल्याची सत्ता अकलूजपुरती मर्यादित, जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील गटाचे जिल्ह्यातील राजकारण संपवले

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी 50-60 वर्षे शिवरत्न बंगल्यावरून एकहाती राजकारण केले. पण तिसऱ्या पिढीतील रणजितसिंह आणि धैर्यशील यांच्या चुकीच्या राजकीय रणनीतीमुळे हा डोलारा कोसळला आहे.

2009 ला घडी विस्कटली
2009 च्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत भारत नाना भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि तिथूनच मोहिते पाटील यांच्या राजकारणाची घडी विस्कटली. आज सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर माळशिरस तालुक्यातही मोहिते पाटील यांच्या राजकारणाला घरघर लागली आहे.

एककाळी ‘मोहिते पाटील बोलले की जिल्हा हलायचा’ अशी स्थिती होती. आज मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे.

जयकुमार गोरे यांनी समीकरणच बदलले
राजकीय वर्तुळातील माहितीनुसार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी अत्यंत चाणाक्षपणे जिल्ह्यात समविचारी लोकांची मोट बांधली आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाचे जिल्ह्यातील वर्चस्व संपवून त्यांना केवळ अकलूजपुरते मर्यादित करून ठेवले आहे. अशीच शिवरत्न बंगल्याची आजची अवस्था झाली आहे.

रणजितसिंहांचे दौरे – बिन बुलाये मेहमान
सुवर्णकाळात रणजितसिंह मोहिते पाटील कायम वरच्या हवेत वावरत होते, त्यांनी कधी खाली पाहिलेच नाही. आता वेळ निघून गेल्यावर ते फुफुट्यातून फिरत आहेत. सध्या न बोलवता कोणाच्याही घरोघरी जाण्याचे त्यांचे दौरे सुरू आहेत.

जिल्ह्यात अस्तित्वच नसताना हे दौरे म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी’ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीगाठींना राजकीय वजन उरले नसून केवळ दिखावा असल्याचे बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button