वेळापूर सेवा सोसायटीची १०१ वी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

दिवाळीनिमित्त सभासदांना ९ टक्के लाभांश वाटपाची घोषणा
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर (ता. माळशिरस) येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर राजकीय, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच शहीद जवान, संस्थेचे संचालक कै. चंद्रकांत क्षीरसागर, बँक अधिकारी कै. संभाजी माने देशमुख आणि संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी संस्थेचा वार्षिक अहवाल सचिव दीपक माळवदकर यांनी सभेसमोर सादर केला. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच दिवाळीनिमित्त सभासदांना ९ टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी सचिव दीपक माळवदकर यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती देताना संस्थेचा ऑडिट वर्ग ‘ब’ असल्याचे सांगितले. संस्थेकडे २५२ कर्जदार सभासद आणि १ हजार ७७ बिगर कर्जदार सभासद, असे एकूण १ हजार ३२९ सभासद असल्याची माहिती त्यांनी दिली.
सभेला व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे, संचालक आनंदराव माने देशमुख, अर्जुन भाकरे, दत्तू माने, विश्वजीत माने देशमुख, हरीश मेटकरी, दत्तात्रेय बनकर, रंगनाथ माने, लक्ष्मण भीमराव मेटकरी, आप्पा आडसूळ, संतोष माने देशमुख, दशरथ मंडले, बाजीराव कुदळे, किसन माने देशमुख, शंकर आडत, रामचंद्र राऊत, नागनाथ भाकरे, दत्तात्रेय मगर, हनुमंत मगर, अरुण पवार, शिवाजी सावंत, अशोक माने देशमुख, दादा चोरमले, दत्तात्रेय आडत, राजकुमार क्षीरसागर यांच्यासह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



