ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे, पुणे यांचे नातेपुते येथे सुश्राव्य कीर्तन होणार

स्व. बबनराव पद्मन यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
नातेपुते (बारामती झटका)
स्वर्गीय बबनराव (दादा) वामन पद्मन यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन मंगळवार दि. २३/८/२०२ रोजी राजवैभव सांस्कृतिक भवन नातेपुते, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त ह. भ प. चंद्रकांत महाराज वांजळे, पुणे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

तरी या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहून सुश्राव्य कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. गजानन बबनराव पद्मन, श्री. राहुल बबनराव पद्मन, श्री. रोहित बबनराव पद्मन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पद्मन परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



