ह. भ. प. दत्तात्रय महाराज घाडगे, निकमवाडी यांचे विजयवाडी येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

वै. सौ. तेजश्री संजय लावंड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
विजयवाडी (बारामती झटका)
वै. सौ. तेजश्री संजय लावंड यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी स्वगृही विजयवाडी, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. या पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. दत्तात्रय महाराज घाडगे, निकमवाडी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वै. सौ. तेजश्री संजय लावंड या विजयवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या होत्या. विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालय विजयनगर विजयवाडी या विद्यालयाचे सभापती श्री. संजय भाऊराव लावंड यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. तर ॲड. लखन संजय लावंड यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, दीर, जावा, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

तरी या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. संजय लावंड, श्री. सिद्धांत लावंड व समस्त लावंड परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त लावंड परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



