राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांची प्रदेश सचिव अक्षयभैया भांड यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट..
पवार परिवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर निष्ठावान समर्थक अक्षयभैय्या भांड यांच्या संपर्क कार्यालयाला आवर्जून भेट दिली..
नातेपुते (बारामती झटका)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख माळशिरस तालुक्याच्या युवा संवाद दौऱ्यानिमित्त आलेले होते. त्यांनी नातेपुते येथील पवार परिवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर निष्ठावान समर्थक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय भैय्या भांड यांच्या नातेपुते येथील संपर्क कार्यालयास आवर्जून भेट दिली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबुब भाई शेख यांनी नातेपुते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेस सचिव अक्षय भांड यांच्या संंपर्क कार्यालयास भेट दिली. त्यांचा सन्मान अक्षयभैया भांड मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आला. माळशिरस तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला व विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राकेश कामठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस अरूण असबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा सचिव अतुल खरात, फोंडशिरस गावचे सरपंच पोपटराव बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनिल गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नातेपुते शहराध्यक्ष शमी मुलाणी, अक्षय चौगुले, रियाज शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शुभस सोरटे, उदय बरडकर, सत्यजित सुरवसे, प्रथमेश पांढरे, बबन आकाडे, तुषार साळवे, संग्राम जाधव, गणेश शेंडे, तुषार साळवे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख माळशिरस तालुक्यामध्ये युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले होते. त्यांनी आवर्जून नातेपुते येथे येऊन प्रदेश सचिव अक्षयभैय्या भांड यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्ते यांच्याशी हितगुज साधलेले आहे. नातेपुते येथील रोजा इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होऊन समाज बांधवांशी सुसंवाद साधला. पवित्र रमजान महिन्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सर्व मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng