साखर सम्राट उद्योजक निलेशदादा दडस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

श्री संत बाळूमामा यांची महाआरती व ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांच्या कीर्तनाचे आयोजन
बांगर्डे (बारामती झटका)
बांगर्डे गावचे दिलदार दिलखुलास,रुबाबदार युवा व्यक्तिमत्व साखर सम्राट उद्योजक निलेशदादा दत्तात्रय दडस यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २०/०८/२०२३ रोजी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत बाळूमामा महाराज यांच्या ३३८ व्या आरती निमित्त भव्य दिव्य महाआरतीचे आयोजन ९ वाजता करण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी २ ते ६ या वेळेत सतोबा बिरोबा गजीढोल मंडळ, टाकेवाडी यांचा गजीढोलाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांचे कीर्तन सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे. त्यानंतर निलेशदादा दडस यांच्यावतीने ९.१५ वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य कार्यक्रमासाठी महालक्ष्मी साऊंड सिस्टिमआणि लाईट शो उंबरे दहिगाव यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या महाआरतीला व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng