गोरडवाडी येथे शेळ्या-मेंढ्या यात्रेतील बक्षीस वितरण संपन्न

गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी ता. माळशिरस येथे ग्रामदैवत श्री बिरोबा बनामध्ये बिरोबा यात्रा कमिटी व समस्थ ग्रामस्थ यांच्यावतीने शेळ्या-मेंढ्याच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचे यंदाचे तिसरे वर्ष असून ही यात्रा उत्साहात संपन्न झाली. या यात्रेला शेळ्या-मेंढ्या मालक व व्यापारी मोठ्या संख्येने आले होते.
या यात्रेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. यामध्ये १० मेंढ्या एकसारख्या असणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचे ७००१ रुपयांचे बक्षीस कै. नानासाहेब आबासाहेब कर्णवर पाटील (माजी सरपंच) यांच्या स्मरणार्थ श्री. बाळासाहेब कर्णवर पाटील (व्हाईस चेअरमन, सद्गुरु श्री श्री साखर कारखाना, राजेवाडी) यांच्याकडून निवृत्ती माने, मोटेवाडी (मा.) यांना देण्यात आले आहे. द्वितीय क्रमांकाचे ५००१ रुपयांचे बक्षीस मामासाहेब भानुदास हुलगे (मा. ग्रा. सदस्य, गोरडवाडी) यांच्याकडून महादेव खरात, मासाळवाडी यांना देण्यात आले आहे. तृतीय क्रमांकाचे ३००१ रु. बक्षीस सुरेश तात्याबा गोरड (वि. सेवा सोसायटी चेअरमन, गोरडवाडी) यांच्याकडून नाना गोरड, गोरडवाडी यांना देण्यात आले आहे.
तसेच दुसा ते जुळाक बकरा असणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचे ७००१ रुपयांचे बक्षीस पांडुरंग किसन पिसे (सरपंच, गोरडवाडी) आणि खंडू बाबू कळसुले (माजी चेअरमन) यांच्याकडून महादेव खरात, मासाळवाडी यांना देण्यात आले आहे. द्वितीय क्रमांकाचे ५००१ रुपयांचे बक्षीस कै. निवृत्ती शंकर गोरड (मा. सरपंच, गोरडवाडी) यांच्या स्मरणार्थ विजय निवृत्ती गोरड (माजी सरपंच, गोरडवाडी) यांच्याकडून पप्पू करे, पळशी यांना देण्यात आले आहे. तृतीय क्रमांकाचे ३००१ रुपयांचे बक्षीस निवृत्ती रामा माने (प्रगतशील मेंढपाळ मोटेवाडी) यांच्याकडून वैभव कुबाळ, शिरताव यांना देण्यात आले आहे.
तसेच या यात्रेमध्ये सर्वात अगोदर एक लाखाच्या पुढील खरेदी करेल त्यांना येदु श्रीमंत गोरड (विकास सेवा सोसायटी सदस्य, गोरडवाडी) यांच्याकडून ११११ रुपयांचे बक्षीस गुलाब बुवाजी (ठेंगले, बारामती) यांना देण्यात आले आहे.

सदरची यात्रा अतिशय उत्साहात पार पडली. या यात्रेमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. मोठ्या प्रमाणात यात्रेचे स्वरूप आल्याने दिवसेंदिवस यामध्ये वाढ होते आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.