अचानक कार्यकर्त्याला आमदार रामभाऊंचा कॉल, विमान प्रवास आणि काशी विश्वनाथाचे दर्शन

बचेरी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय व आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते हे आपल्या कार्यकर्त्यांवर नेहमीच जीवापाड प्रेम करतात. ते आपल्या कार्यकर्त्यांला कधीही लहान, गरीब, श्रीमंत असा भेदभाव करत नाहीत. सर्व कार्यकर्त्यांशी मा. आ. रामभाऊ नेहमी सर्वांशी मित्रत्वाने व्यवहार करतात. त्यांच्यामध्ये व कार्यकर्त्यांमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट चा अडसर कधी येत नाही. याबाबतीतले एक ताजे उदाहरण परवा पाहायला मिळाले.
बचेरी येथील रहिवासी असलेले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भाजपाचे कट्टर युवा कार्यकर्ते पैलवान रामभाऊ गोरड यांना दि. 26 जुलै रोजी अचानक माननीय आमदार रामभाऊंचा कॉल आला. व आपण चार दिवस बाहेर जायचे आहे, असे सांगितले त्यासाठी तयारी करा. रामभाऊ गोरड यांना आश्चर्य वाटले व अचानक शेतीकामातून वेळ काढून वाराणसी येते चार दिवस कसे जायचे असा प्रश्न पडला.

रामभाऊ गोरड यांनी परिसरामध्ये कॉल करून याबाबत काय करावे विचारले तेव्हा प्रा. सदाशिव शिंदे यांनी अशी संधी सोडू नका, मा. भाऊंबरोबर जाणे व त्यांच्यासोबत चार दिवस राहणे म्हणजे चालत्या बोलत्या ज्ञानपीठात राहण्यासारखे आहे, असे सांगितले.
मा. आ. रामभाऊंनी यावेळी एका सामान्य कार्यकर्त्याला बैठकीसाठी न्यायचे व विमान प्रवास पर्यटन घडवून आणायचे, याचबरोबर संघटनात्मक बांधणी याबद्दल माहिती द्यायची, हे कौतुकास्पद काम केले. सामान्य कार्यकर्त्यालाही मोठं करायचं, हा हेतू मा. आ. रामभाऊंचा असावा.

रामभाऊ गोरड पुण्यात पोहचल्यानंतर विमानाचे तिकीट तयार होते आणि भाऊंसोबत आपल्याला पुणे ते वाराणसी काशी विश्वेश्वर असा प्रवास करायचा आहे, हे समजल्यानंतर रामभाऊ गोरड यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. वाराणसी येथे पोहचल्यावर देवदेवतांचे दर्शन घेऊन, गंगा नदी स्नान करून चांगला अनुभव घेतला. काशीला इतक्या लहान वयात जायचे भाग्य लाभले याचा आनंद झाल्याचे रामभाऊ गोरड यांनी सांगितले.
परतीचा प्रवास मा. आ. रामभाऊंसोबतच विमानात झाला. राम गोरड यांचे वडील दामोदर गोरड मेंढपाळ व्यवसाय करतात. आपल्या मुलाला मोठी संधी देऊन सोबत घेऊन गेल्याबद्दल माननीय आमदार रामभाऊ सातपुते यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले व त्यांच्या कार्यकर्त्यांवरील प्रेमाचे कौतुक केले.
रामभाऊ गोरड यांनी सांगितले की, मी गावामध्ये माननीय आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी चांगले काम केले आहे. त्यामुळे माननीय भाऊंनी मला ही संधी मिळवून दिली. माझा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे खूप आनंद वाटला. माननीय भाऊंनी तळागाळातल्या कार्यकर्त्याऊवर इतकी खोलवर जाऊन दखल घेतल्याबद्दल बचेरी भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सदाशिव शिंदे यांनी मा. आ. राम सातपुते साहेब यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



