मांडवे गावचे आदर्श सरपंच रितेश पालवे पाटील यांचा राजीनामा…

मांडवे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी ग्रामपंचायत मांडवे, ता. माळशिरस या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रितेश बबनराव पालवे पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा माळशिरस पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बी. एच. कदम यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी युवा नेते प्रशांत हनुमंतराव पालवे पाटील, सरपंच रितेश बबनराव पालवे पाटील, उपसरपंच सुरज दिनकर साळुंखे पाटील, माजी सरपंच हनुमंत भीमराव टेळे, रफिक शेखलाल मुलाणी, गजानन दत्तात्रय पालवे आदी उपस्थित होते.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच स्वर्गीय लोकनेते जयवंततात्या पालवे पाटील व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच ज्येष्ठ नेते बबनबापू पालवे पाटील, दोन्ही गट एकत्र येऊन मांडवे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाचा कार्यकाल ठरलेला होता. ठरल्याप्रमाणे विद्यमान सरपंच रितेश बबनराव पालवे पाटील यांनी माळशिरस पंचायत समिती येथे आपला राजीनामा स्वयंस्फूर्तीने दिलेला आहे. लवकरच मांडवे ग्रामपंचायतला नवीन सरपंच ठरल्याप्रमाणे होणार आहे.
मांडवे ग्रामपंचायतच्या बिनविरोध सरपंच पदी रितेश बबनराव पालवे पाटील यांनी पदभार घेऊन नऊ महिने झालेले आहेत. त्यांना मिळालेल्या कार्यकाळामध्ये लोकाभिमुख ग्रामपंचायत प्रशासन चालविलेले होते. त्यांच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयाचा निधी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून मांडवे गावाला भरघोस निधी मिळालेला होता. या निधीतून दर्जेदार व गुणवत्ता विकास कामे केलेली आहेत. कायम रितेश पालवे पाटील यांचा कार्यकाल मांडवीकरांच्या कायम स्मरणात राहील, अशा पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळलेला होता.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.