Uncategorizedराजकारण

भाजपचे संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली.

मांडवे (बारामती झटका)

शिवामृत दूध संघाचे चेअरमन व भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील मांडवे 50 फाटा येथील श्रीराम निवासस्थान येथे शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी सकाळी सांत्वनपर भेट घेतली.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. 26/06/23 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण ता. आष्टी, जि. बीड येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी, क्रियाकर्म करून शुक्रवार दि. 30/06/2023 रोजी सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.

शिवामृत दूध संघाचे चेअरमन भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, शिवामृत दूध संघाचे संचालक नारायण सालगुडे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तानाजी पालवे पाटील, मांडवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दीपकराव माने देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort