ताज्या बातम्याराजकारण

केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांचे सोलापूर विमान तळावर जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्र्यांनी जंगी स्वागत केले…

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर विमानतळ येथे विमानसेवेचा आज प्रारंभ झाला असून या कार्यक्रमासाठी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ विमानतळावर पोहोचले असता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत केले.

यावेळी माजी खासदार श्री. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, ज्येष्ठ आमदार श्री. विजयकुमारजी देशमुख, आमदार श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार श्री. समाधानदादा आवताडे, आमदार श्री. देवेंद्रजी कोठे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button