महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या शुभहस्ते पानीव येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

पानीव (बारामती झटका)
पानीव ता. माळशिरस, येथे ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व तलाठी कार्यालय लोकार्पण सोहळा तसेच पानीव-तरंगफळ काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन डॉ. नितीन करीर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते शनिवार दि. १५ जून २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत राजेश कुमार अपर मुख्य सचिव महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य, श्रीमती आभा शुक्ला अपर मुख्य सचिव उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र राज्य, लोकेश चंद्रा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त पुणे, कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर, श्रीमती मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर आदी मान्यवर असणार आहेत.

तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच, ग्रामसेवक, सदस्य व सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत, पानीव यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.