आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पंढरपूर (बारामती झटका)
अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक, माथाडी कामगारांचे आराध्य दैवत, मराठा क्रांतीसुर्य, थोर मराठा कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंहगर्जना ग्रुप पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डाॅ. शुभम आगवणे व पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक श्री. दशरथ वाघमोडे साहेब तसेच मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. अर्जुनराव चव्हाण उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना वाघमोडे साहेब यांनी मराठा महासंघाचे कौतुक केले की, मराठा महासंघाच्या वतीने नेहमीच सामाजिक, समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात व इथुन पुढेही असेच सामाजिक उपक्रम राबविले जावेत असे आवाहन केले व सदिच्छा दिल्या. तसेच अर्जुनराव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठी खुप मोठे मोलाचे योगदान आहे. तसेच अखेरच्या श्वासापर्यंत ते समाजासाठी लढले नाही तर स्वतःच्या देहाचे आत्म बलीदान केले. तसेच माथाडी कामगारांसाठीही मोलाचं योगदान आहे. तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला लावलेल्या जाचक नियम व अटी रद्द कराव्यात तसेच अनेक लाभार्थी यांना गेले अनेक महिने हप्ते वेळेवर भरून सुद्धा व्याज परतावा मिळाला नाही तो लवकरच मिळावा. तसेच प्रकरणाची मर्यादा वाढवावी अशी भावना याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.

यावेळी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक श्री. सौरभ मगर, माजी सरपंच शिवाजी खपाले, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, युवक जिल्हाध्यक्ष-शिवाजी मोरे, युवा जिल्हा संघटक- रोहित चव्हाण, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष – हनुमंत कदम, तालुकाध्यक्ष- संतोष जाधव, शहराध्यक्ष -अमोल पवार, शहर उपाध्यक्ष- शामराव साळुंखे, शहर संघटक- काका यादव, जिल्हा संघटक- गुरुदास गुटाळ, युवक शहराध्यक्ष- शुभम ताठे- देशमुख, शहर कार्याध्यक्ष- पांडुरंग शिंदे, व्यापार उद्योग आघाडी अध्यक्ष- नानासाहेब शिंदे, रिक्षा संघटना अध्यक्ष- नागेश गायकवाड, महिला तालुका उपाध्यक्षा अर्चनाताई चव्हाण, महिला शहर उपाध्यक्षा अश्विनीताई साळुंखे, आप्पा गाजरे अध्यक्ष भाजपा, विश्वक्रांती मालवाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मलपे, ओंकार देसाई, आण्णा पाटील, राघु गुटाळ, वैभव सिरसट, दादा आसबे, सुरज पडवळे, भैय्या देशमुख, महेश बोडके, राजेंद्र चव्हाण, वैभव चव्हाण, विनायक चव्हाण, शकिल मुलाणी, राम साळुंखे, सुधिर थिटे, सोपानकाका देशमुख, शिवसेना अध्यक्ष तानाजी मोरे, नागेश कोरके, जिवन गायकवाड, विवेक साळुंखे, सागर पवार, सोहम कुसूमडे, समाधान कुसूमडे, महादेव काशिद, रोहित कदम, राजू येलपले यांच्यासह समाज बांधव, भगिनी, मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



