ताज्या बातम्याराजकारण

रणजीतदादा जसा देहाचा तसाच दिलाचा, नावातच सिंह नाही तर वागण्यामध्ये सुद्धा सिंहच आहेत, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले….

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या धाडसाची राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे…

फलटण (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर उर्फ रणजीतदादा जसा देहाचा तसाच धाडसी दिलाचा. नावातच सिंह नाही तर वागण्यामध्ये सुद्धा सिंहच आहेत. रणजीतदादांच्या कृतीमुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेले आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या धाडसाची राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे…

विधान परिषदेचे माजी सभापती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक वेळा अनेक खात्याचे मंत्री असणारे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जुलमी प्रस्थापित राजकारण उलथून टाकून सर्वसामान्य रयतेचे राजकारण फलटण तालुक्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी करून दाखवलेले आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले अशी सत्ता केंद्रे हस्तगत केलेली आहेत. फलटण शहर व तालुक्यामध्ये अनेक रखडलेली विकास कामे करून शहरांमध्ये अनेक शासकीय कार्यालय आणलेली आहेत.

दिवसेंदिवस रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची लोकप्रियता वाढत असल्याने वैफल्यग्रस्त झालेले रामराजे निंबाळकर आणि त्यांचा परिवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर बेताल वक्तव्य करून टीका करीत आहेत. वेळप्रसंगी धमकी सुद्धा देत आहेत. अशाच एका पत्रकार परिषदेमध्ये रामराजे यांनी रणजीतसिंह यांना आव्हान केलेले होते. पोलीस संरक्षण काढून फिरून दाखवा या आव्हानाला प्रतिसाद देत रणजीतसिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन सायंकाळी दहा वाजता गजानन चौकामध्ये बिना पोलीस संरक्षणमध्ये येत आहे असे सांगून रात्रीच्या दहा वाजता गजानन चौकामध्ये येऊन महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बुलेटवर बसून मी आलोय. अशी गर्जना करून कोणीच न आल्याने शेवटी रामराजे यांच्या घरासमोर जाऊन गाडीच्या बाॅनेटवर बसूनच राहिले होते.

सदरचा प्रकार पाहण्याकरता प्रसारमाध्यम मीडियाने तो क्षण टिपलेला होता. प्रसारमाध्यमांनी सदरच्या घटनेचे वार्तांकन केलेले होते. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या धाडसाची राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे. रणजीतदादांच्या या कृतीमुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेले आहे. रणजीतदादा जसा देहाचा तसाच दिलाचा नावातच सिंह नाही तर वागण्यामध्ये सुद्धा आहेत अशी रणजीतदादांची प्रतिमा जनमानसांमध्ये झालेली आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button