अज्ञात वाहनाच्या धडकेत अंकोलीच्या युवकाचा मृत्यू

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
मोहोळ तालुक्यातील कुरूल-विजापूर हायवेवर दि. २१/६/२०२५ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत २५ वर्षीय अंकोली च्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुरुल गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला. अंकोली (ता. मोहोळ) येथील रोहित दिलीप गायकवाड (वय २५) हे मोटरसायकल क्रमांक MH13 BU7234 वरून प्रवास करत असताना अचानक अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांना तातडीने स्थानिक नागरिकांनी CNS हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, तिथे दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.