ताज्या बातम्यासामाजिक

गोरडवाडी गावचे ग्रामदैवत श्री बिरोबा यात्रेनिमित्त मोफत हेल्मेट वाटप व भव्य बाईक रॅलीचे आयोजन

चि. शिवेंद्रसिंह आणि चि. अभयसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त कर्णवर पाटील परिवार यांचे कडून स्तुत्य उपक्रमाचे आयोजन.

गोरडवाडी (बारामती झटका)

गोरडवाडी गावचे ग्रामदैवत श्री बिरोबा यात्रेनिमित्त व चि. शिवेंद्रसिंह सोमनाथ कर्णवर पाटील आणि चि. अभयसिंह अमोल कर्णवर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दि. 25/03/2026 रोजी सकाळी 09 वाजता मोफत हेल्मेट वाटप व भव्य बाईक रॅलीचे कर्णवर पाटील परिवार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेले आहे.

गावचे ग्रामदैवत बिरोबा यात्रा व परिवारातील चिमुकल्यांचा अभिष्टचिंतन सोहळा असा दुग्ध शर्करा योग निमित्ताने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष शेळके यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज श्री. संभाजी गावडे, नूतन डीवायएसपी श्री. प्रदीप गोरड, माळशिरस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास दिंडोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. बाळासाहेब कर्णवर पाटील, ठाणे शहर क्राईम ब्रँच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ कर्णवर पाटील, कमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल कर्णवर पाटील, श्री. शामराव कर्णवर पाटील, श्री. अजित कर्णवर पाटील, श्री. धुळदेव कर्णवर पाटील, श्री. कांतीलाल कर्णवर पाटील, श्री. सचिन कर्णवर पाटील, श्री. शिवाजी कर्णवर पाटील व समस्त कर्णवर पाटील परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

सदरचा कार्यक्रम कमल फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे. सदरची बाईक रॅली गोरडवाडी वरून माळशिरस येथून पुन्हा गोरडवाडी येथे बिरोबा मंदिर येथे समारोप होणार आहे. सहभागी होणाऱ्या बाईकस्वारांना मोफत हेल्मेट दिले जाणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button