अकलूज येथे ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
कै. गोरखनाथ लोणकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथील कै. गोरखनाथ केरबा लोणकर यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दि. १६/१०/२०२२ रोजी होणार आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे (सुपली, पंढरपूर) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये साई मार्ग – ४ सयाजीराजेनगर, संग्रामनगर, अकलूज येथे करण्यात आले आहे.
त्यानंतर बारा वाजता पुष्पवृष्टी होणार आहे. सर्व मित्रमंडळी, पैपाहुणे यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीमती प्रमिला गोरखनाथ लोणकर, युवराज गोरखनाथ लोणकर, सौ. डॉ. राजश्री मच्छिंद्र गायकवाड (मुलगी), सौ. जयश्री राजेंद्र शिंदे (मुलगी), सौ. अनुराधा महेश देडगे (मुलगी) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
घाई गडबडीत नजर चुकीने आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण मिळाल्यास हेच निमंत्रण समजून सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व नातेवाईक, पैपाहुणे, मित्रमंडळी यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त लोणकर, गायकवाड, शिंदे आणि देडगे परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Muchas gracias. ?Como puedo iniciar sesion?