सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेला ऊस तोडणी कामगारांचा कळवळा
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचा हालचाली सुरू
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री विजयराव मंडलिक व इतर दुकानदार यांनी निवेदन दिलेले आहे.
सदरच्या निवेदनामध्ये ऊस तोडणी मजूर व कामगारांसाठी स्वस्त धान्य मिळण्याकरता अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध करावा. सर्वच ठिकाणी सहकारी व खाजगी कारखाने सुरू आहेत. कारखान्यासाठी भरपूर ऊस तोडणी मजूर व कामगार वर्ग बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहे. माळशिरस तालुक्याच्या अनेक गावांमध्ये वास्तव्य आहे. ऊस तोडणी कामगारांना बाजारभावाप्रमाणे महाग धान्य घ्यावे लागत आहे. सर्वांना रास्त भाव धान्य दुकानातून धान्य मिळण्यासाठी काहीतरी तजवीज करावी, ऊसतोड मजुरांना धान्य वाटप करण्यासाठी संबंधित स्वस्त धान्य दुकानदार त्यांना त्या प्रमाणात अतिरिक्त साठा उपलब्ध करण्याची विनंती संघटनेने केलेली होती.
लोकप्रिय आमदार यांना ऊस तोडणी कामगारांच्या व्यथा जवळून पाहता आलेल्या असल्याने आमदार यांनी सदर निवेदनाच्या अनुषंगाने तात्काळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व अन्न नागरी पुरवठा मंत्री यांना पत्र पाठवून पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in this piece! For more, visit: FIND OUT MORE. Let’s chat about it!