कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचा माळशिरस तालुक्यातील युवकांच्यावतीने सन्मान संपन्न
इंग्रज कालीन फलटण-लोणंद रेल्वे व रखडलेला निरा-देवधर प्रकल्पाच्या कॅनॉलचा प्रश्न मार्गी लावल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माळशिरस (बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी इंग्रज कालीन फलटण-लोणंद रेल्वेचा प्रश्न व माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा रखडलेला निरा-देवधर प्रकल्पातील कॅनॉल प्रकल्प, असे दोन तालुक्यातील महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेऊन निधीची तरतूद केल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील युवकांचा बुलंद आवाज एकशिव गावचे थोर सुपुत्र युवा नेते प्रतीक जानकर यांनी तालुक्यातील युवकांच्या वतीने देवेंद्रजी फडवणीस यांचा सन्मान केला. यावेळी रविराज खाडे उपस्थित होते.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना माढा लोकसभा मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचा पत्रव्यवहार व भेट घेतली होती. लोकसभा मतदारसंघातील विकास कामांमध्ये माळशिरस तालुक्यातील इंग्रज कालीन लोणंद-पंढरपूर व सध्याचा फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग व निरा-देवधर प्रकल्पामधील रखडलेले कॅनॉल दोन्ही प्रश्न बैठकीमध्ये होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन प्रश्नांसह अनेक विकासकामांना मंजुरी देऊन निधीची तरतूद केलेली होती. फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50% खर्चाच्या निधीचा वाटा उचलण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचे पत्र केंद्र सरकारला दिलेले होते. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी निधीची तरतूद केलेली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी अधिवेशनामध्ये नीरा देवधरचा प्रश्न मांडलेला होता. पत्रव्यवहारही केलेला होता. सातत्याने देवेंद्रजी फडवणीस यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही सततचा पाठपुरावा ठेवून दोन्ही प्रश्न मार्गी लागलेले असल्याने भविष्यात तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार असून रेल्वे मार्गामुळे दळणवळण व उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे. माळशिरस तालुक्यातील युवकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांचे अभिनंदन करून ज्यांच्यामुळे रखडलेल्या प्रश्नाला वाचा फोडली असे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचा युवा नेते प्रतीक जानकर यांनी सन्मान करून अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article had me laughing and learning! For those interested, check out: DISCOVER HERE. What’s your take?