पालघरचे डांसर करमाळ्यात दाखल
बाळासाहेबांच्या शिवसेनेचा करमाळा झंझावात
करमाळा (बारामती झटका)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा धर्मवीर आनंद दिघे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पालघर, मुंबई, गुजरात आणि नागपूरहून डान्सर सहभागी होण्यासाठी आले असून
कार्यक्रमाचे संपूर्ण शहरात उत्सुकता लागून राहिली आहे.
या सभामंडपात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी रुग्णांना मोफत औषधे दिली जात असून मोफत चष्म्याचे वाटप सुरू आहे. शिवाय तपासणीनंतर एखाद्याला ऑपरेशन सर्जरी व मोठ्या उपचाराची गरज लागली तर त्याला मोठ्या शहरातील रुग्णालयात मोफत उपचार किंवा कमी सवलतीच्या दरात उपचार करून देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत कक्षाचा एक कक्ष येथे उभा करण्यात आला असून मोठ्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
करमाळ्यातील या फेस्टिवलमध्ये वय वर्षे 14 ते 20 व खुला गट अशा स्पर्धा घेण्यात येत असून पाच हजारापासून 51 हजारापर्यंत बक्षीस आहेत.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध सरकारक्रांती मुळेगावकर यांचा होम मिनिस्टर हा शुक्रवारी सहा ते दहा दरम्यान कार्यक्रम होणार आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी फक्त महिलांनाच प्रवेश असणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was both informative and hilarious! For further reading, check out: LEARN MORE. What do others think?