प्रदेश संयोजक आ. श्रीकांतजी भारतीय व आ. राम सातपुते यांचा काळमवाडीचे सरपंच भुजंगराव शिंगाडे यांनी सन्मान केला.
माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संयोजक आमदार श्रीकांतजी भारतीय यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
वेळापूर ( बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविजय २०२४ असा महत्त्वाकांक्षी संकल्प करून प्रदेश संयोजकपदी निवड केलेले श्रीकांतजी भारतीय पहिल्यांदाच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत भाजपच्या वतीने करण्यात आले. यावेळी खास सत्कार काळमवाडी गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच भुजंगराव शिंगाडे यांनी गुलाबपुष्पांच्या हाराने भारतीय जनता पार्टीचे महासचिव व नूतन प्रदेश संयोजक आमदार श्रीकांतजी भारतीय व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा वेळापूर नगरीमध्ये काळमवाडी ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार केला.
यावेळी के. के. पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य, हनुमंत सूळ आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य, सोपान नारनवर जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, बाळासाहेब वावरे, दादासाहेब उराडे, भानुदास राऊत नगरसेवक नातेपुते, संजय देशमुख संघटन सरचिटणीस, लक्ष्मण माने तालुका उपाध्यक्ष, युवराज वाघमोडे, देविदास चांगण, प्रवीण काळे, बलभीम जाधव, प्रशांत ताटे, विनोद थिटे माळशिरस शहराध्यक्ष, डॉ. देवकते, पिनू कदम, राहुल मदने, महादेव कावळे, अक्षय वायकर, ॲड. मारुती वाघमोडे, ज्ञानेश्वर शेळके, संतोष कारंडे, ज्ञानेश्वर पंचवाघ, भानुदास चोरमले, राऊत सरपंच जळभावी, सुभाष साठे सरपंच मगराचे निमगाव, किरण पाटील, महावीर मगर, मिनीनाथ मगर आदी मान्यवरांसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळमवाडी ग्रामपंचायतची पंधरा वर्षाची सत्ता उलथवून भुजंगराव शिंगाडे यांनी एक हाती सत्ता मिळविलेली आहे. श्रीकांतजी भारतीय व राम सातपुते यांचा सन्मान गुलाबपुष्पांच्याहाराने केलेला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great article! I loved the humor you infused into the topic. For a deeper dive, check out this link: EXPLORE NOW. What do you think?