आ. राम सातपुते हे पुन्हा २०२४ साली आमदार म्हणुन १००% निवडुन येतील व कॅबिनेट मंत्री होतील – राजेंद्र वळकुंदे, शहर उपाध्यक्ष
भाजपचे माळशिरस शहर उपाध्यक्ष राजेंद्र वळकुंदे यांनी आ. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतला आढावा…
माळशिरस (बारामती झटका)
खरंच मी माझ्या ४० वर्षाच्या जीवनातील पहिलेच इतके प्रामाणिक आणि सहनशील आमदार पाहिले आहेत. सातपुते साहेब आमदार होण्यापुर्वी १ वर्ष अगोदर गावामध्ये फिरत होते. काही ठराविक लोक सोडले तर कोणासही ते फारसे माहित नव्हते. सातपुते साहेब हे माळशिरसचे भावी आमदार असतील, असा विचारही कुणी स्वप्नात केला नसेल. ज्यावेळी सातपुते साहेब यांनी विधानसभेचा फॉर्म भरला, प्रचार चालु झाला, त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी “पाहुणा तु कुण्या गावचा $$$ तुला तिकीट दिल कोणी या गावाचं र$$$…” असले गाणे वाजवले आणि टिंगल केली.
परंतु माळशिरस तालुक्यातील ज्या लोकांच्या रक्तामध्येच भाजप आहे, अशा लोकांनी उदा. माळशिरसमधील माजी जिल्हा परिषद सदस्या, माजी ग्रामपंचायत सरपंच, माजी नगर सेविका सौ. संजिवनी (ताई) पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य नारायणराव घोडके, माजी नगराध्यक्ष आकाश सावंत यांच्या गटाने माळशिरसमध्ये व किसान मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव नारनवर, भाजप तालुका सरचिटणीस संजय देशमुख गटाने जिद्दीला पेटून भरघोस मतदान करुन सातपुते साहेब यांना विजय मिळवून दिला. हे सर्व सातपुते साहेब यांच्यावरील विश्वासाने साध्य झाले.
पुढे सातपुते साहेब आमदार झाल्यानंतर त्यांनी माळशिरस येथे पंधरा दिवसातून एकदा जनता दरबार घेऊन तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम चालु केले. त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई येथील नामांकीत हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय सेवा मोफत करुन रुग्णांना जीवदान दिले. तसेच गोरगरीब जनता आमदार साहेब यांचेकडे काम घेऊन आले की, तुमचे काय काम आहे असे विचारत व लगेच त्याची दखल घेऊन ज्या त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोन करुन लोकांची कामे तोबडतोब मार्गी लावत आहेत.
मी एक सामान्य कार्यकर्ता. मी ही एकदा माझ्या मित्राचे काम घेऊन आमदार साहेब यांच्याकडे गेलो. त्यांनी माझ्या मित्राचे काम एका फोनवरती केले. त्यावेळी माझ्यासमोर एक ग्रामीण भागातील मुलगी शिक्षणासाठी SBI बँकेकडे शैक्षणिक कर्ज घेणेसाठी तिच्या वडीळासोबत तीन-चार महिने हेलपाटे मारत होती. त्यांना बँक मॅनेजर कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यांनी त्यांची सर्व हकीकत आमदार साहेब यांना सांगिल्यावर लगेच त्यांनी SBI बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांना फोन करुन सांगितले. स्वतः आमदार साहेबांनी सुध्दा शाखेत फोन करुन तातडीने त्या मुलीचे शैक्षणिक कर्ज मंजुर करण्याचे आदेश दिले. अशा पद्धतीने लोकांची कामे तातडीने करण्याची त्यांची पद्धत सर्वांना माहीत आहे.
तालुक्यामध्येही अनेक रस्ते, समाज मंदीर, सभा मंडप इत्यादी कामांसाठी ते मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत. तालुक्यातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी ते झटत आहेत. तसेच तालुक्यातील कोणतीही व्यक्ती कसलेही काम घेऊन गेल्यास मोकळ्या हाताने कोणीही माघारी गेलेले मी आजपर्यंत बघिलेले नाही. आ. रामभाऊ सातपुते साहेब हे सन २०१९ साली आमदार झाले तेव्हापासून तालुक्यातील जनतेला कळाले की, आमदार साहेब म्हणजे कोण असते व त्यांचेकडे काय काय कामे असतात. जनतेला विश्वासात घेऊन, विविध कामे करून त्यांनी विरोधी पक्षाला दाखवून दिले की पाहुणा याच तालुक्यातील प्रत्येक घरातील सदस्य आहे.
या अगोदर कसला आमदार होता, तो तालुक्यात कधी येत होता, कुठे येत होता हे कोणास माहितही नव्हते. “आमदार दाखवा, एक हजार रुपये मिळावा” अशी घोषणा सुध्दा होत होती. तो फक्त दिवाळीला व पालखीला बॅनरवरती दिसत असे.
आमदार रामभाऊ सातपुते साहेब हे पुन्हा २०२४ साली आमदार म्हणुन १००% निवडुन येतील व कॅबिनेट मंत्री होतील, हे तालुक्यातील जनतेचे व माझे स्वप्न आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या पुढील राजकारणासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
शुभेच्छुक श्री. राजेंद्र केशव वळकुंदे (उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, माळशिरस शहर)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng