….राया वाटलं नव्हतं तुम्ही एकत्रित याल… अकलूजच्या लावणी महोत्सवात लावणी गाजणार…
फत्तेसिंह माने पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, के. के. पाटील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत हातात हात घालून…
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंह माने पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी के. के. पाटील यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत गट तट पक्ष भेद विसरून एक मनाने एक दिलाने हातात हात घालून निवडणूक लढवत आहेत. पहिल्यांदाच मोहिते पाटील यांच्या विरोधातील विरोधी गट एकत्र आलेला असल्याने माळशिरस तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात व राज्यात चर्चा सुरू आहे. अकलूज येथे लावणी महोत्सव बंद होता तो सुरू होणार आहे. सदरच्या लावणी महोत्सवात “राया वाटलं नव्हतं तुम्ही एकत्रित याल” या लावणीला भरभरून प्रतिसाद मिळेल, असा लावणी क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे.
महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी घडत असताना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगर, सगळं कसं ओके… या डायलॉगवर गाणं तयार झालेलं आहे. माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनेक गट तट पक्ष भेद विसरून राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय व इतर छोटे-मोठे पक्ष एकत्र येऊन मोहिते पाटील यांना मोठे आवाहन उभे केलेले असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू असतानाच अकलूजची लावणी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे. सदरची लावणी स्पर्धा बंद होती. संयोजन समितीने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या लावणी महोत्सवात माळशिरस तालुक्यातील नवीन राजकीय परवाची लावणी “राया वाटलं नव्हतं, तुम्ही एकत्रित याल…” या लावणीने महाराष्ट्रात धुमाकूळ घालेल असे लावणीत क्षेत्रामध्ये बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng