भाजपचे राजकुमार पाटील व बाळासाहेब सरगर यांच्या भूमिकेकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी या दोन्ही गटाच्या प्रचार शुभारंभाकडे दोघांनी पाठ फिरवली.
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरस व रंगत वाढलेली असताना भाजपचे प्रांतिक सदस्य व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागाचे भाजपचे नेते राजकुमार पाटील व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीरा-देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर या दोन भाजपच्या बुद्रुक नेत्यांनी सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाच्या प्रचाराच्या शुभारंभाकडे पाठ फिरवली असल्याने भाजपचे राजकुमार पाटील व बाळासाहेब सरगर यांच्या भूमिकेकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
शिवरत्नवरील मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. माळशिरस तालुक्यात मूळ भाजप असणारे बुद्रुक व भाजपमध्ये प्रवेश केलेले मोहिते पाटील गट खुर्द अशी भाजपची माळशिरस तालुक्यात ओळख आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गट भाजपच्या बुद्रुक गटाला सामावून घेतील का नाही, असे प्रसार माध्यमांवर बातम्या प्रसारित झाल्यानंतर सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून भाजपमध्ये असणारे भानुदास राऊत व संदीप पाटील यांना उमेदवारी दिलेली होती. भाजपचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील हे काँग्रेसचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांच्यासोबत माळशिरस तालुका विकास आघाडी माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपच्या बुद्रुकमध्ये फाटाफूट दिसत आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून भाजप बुद्रुकच्या नेते व कार्यकर्ते यांना प्रचार शुभारंभाचा निरोप मोहिते पाटील परिवार व कार्यकर्त्यांमार्फत होता. सदरच्या कार्यक्रमास कोणीही भाजप बुद्रुक मधील नेते व कार्यकर्ते प्रचार शुभारंभास उपस्थित नव्हते.
परिवर्तन पॅनलच्या प्रचार शुभारंभाचे निमंत्रण भाजपच्या बुद्रुक नेते व कार्यकर्ते यांना आवर्जून देण्यात आले होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, नातेपुते नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र उर्फ दादासाहेब उराडे, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, नातेपुते शहराध्यक्ष भैय्यासाहेब चांगण, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे यांच्यासह अनेक बुद्रुकचे कार्यकर्ते व नेते आवर्जून उपस्थित होते. मात्र, राजकुमार पाटील व बाळासाहेब सरगर प्रचार शुभारंभाचे निमंत्रण असताना सुद्धा उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. दोन्हीही प्रचाराच्या शुभारंभास आमंत्रण असताना उपस्थित न राहिल्याने राजकुमार पाटील व बाळासाहेब सरगर यांच्या भूमिकेकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. राजकुमार पाटील पूर्व भागातील भाजपचे बडे नेते आहेत तर, बाळासाहेब सरगर यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध असणारे अजात शत्रू आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Existe alguma maneira de recuperar o histórico de chamadas excluídas? Aqueles que possuem backup na nuvem podem usar esses arquivos de backup para restaurar registros de chamadas de celular.
Great article! The clarity and depth of your explanation are commendable. For additional insights, visit: LEARN MORE. Looking forward to the community’s thoughts!
Hello! Do you know if they make any plugins to assist with
SEO? I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
If you know of any please share. Many thanks! I saw similar article here: Eco product