पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत तरंगफळ येथे विविध कार्यक्रम आयोजित
तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या गावातील पुतळ्याला व ग्रामपंचायतमधील प्रतिमेला सरपंच सौ. पद्मिनी नारायण तरंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी श्रीमती जगुबाई मारुती जानकर आणि श्रीमती मनीषा रामचंद्र गेंड या ग्रामपंचायतमधील दोन कर्तबगार सामाजिक महिला कार्यकर्त्यांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी श्री. संतोष पानसरे भाऊसो, उपसरपंच पांडुरंग कांबळे, सदस्य जगुबाई जानकर, अश्विनी बोडरे, राघूबाई तरंगे, जयश्री तरंगे, भगवान तरंगे, रावसाहेब कांबळे, नारायण तरंगे, विक्रम बागाव, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर, कार्यावर नागनाथ साळवे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने अनेक नागरी सत्कार करण्यात आले.
सुजाता सावळा कांबळे (मुंबई पोलीस), प्रियांका नामदेव तरंगे (रत्नागिरी पोलीस), चंद्रकांत सदाशिव कांबळे (विद्युत सेवक) प्रणाली दादासो बागाव (HSC प्रथम क्रमांक), रणजित दादासो काळे ( IIT रुडकी उत्तराखंड, प्रथम श्रेणी), मधुकर आप्पा नरळे (एसटी महामंडळ, निवृत्त कर्मचारी) आणि नागनाथ संपत साळवे यांना कला, सामाजिक प्रबोधन कार्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सांगता ग्रामसेवक पानसरे भाऊसाहेब यांनी केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng