चिरंजीव शुभम मोरे देहूकर, मळोली आणि चि. सौ. कां. सुमेधा लोकरे, लऊळ यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…
जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज विवाह बंधनात अडकणार..
मळोली (बारामती झटका)
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नववे वंशज वैकुंठवासी ह. भ. प. गुरुवर्य मधुसूदन ज्ञानेश्वर मोरे देहूकर यांचे नातू व श्री संत तुकाराम महाराज देहू संस्थांचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बापूसाहेब मधुसूदन मोरे देहूकर यांचे पुतणे व श्री. सचिदानंद उर्फ नंदकुमार मधुसूदन मोरे देहूकर रा. मळोली, ता. माळशिरस, यांचे चिरंजीव शुभम मोरे देहूकर आणि स्वर्गीय रामदास आबु लोकरे यांची नात व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापूरचे कार्यकारी संचालक श्री. देवराव रामदास लोकरे रा. लऊळ, ता. माढा, यांची ज्येष्ठ सुकन्या चि. सौ. कां. सुमेधा लोकरे यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. २ जुलै २०२३ रोजी दुपारी ०१ वाजून ३२ मिनिटे या शुभ मुहूर्तावर संकेत मंगल कार्यालय, बायपास रोड कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन मोरे देहूकर परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू अध्यक्ष व विश्वस्त मंडळ स्वागतोत्सुक आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng