लोकनेते भीमरावतात्या सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन…
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मीबाई सावंत यांचे पती लोकनेते भीमरावतात्या सावंत यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन..
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मीबाई भिमराव सावंत यांचे पती लोकनेते भीमरावतात्या सावंत यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
लोकनेते भीमरावतात्या सावंत यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त गुरुवार दि. 03/08/2023 रोजी सकाळी 10 वाजता मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय माळशिरस येथे केलेले आहे. शुक्रवार दि. 04/08/2023 रोजी सकाळी 09 वाजता रक्तदान शिबिर नालंदा बुद्ध विहार माळशिरस येथे होणार आहे. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. शनिवार दि. 05/08/2023 रोजी बुद्धम संस्कार पद्धतीने 12.05 मिनिटांनी नालंदा बौद्ध विहार सिद्धार्थ नगर माळशिरस येथे कार्यक्रम होणार आहे.
तरी सर्व मित्र परिवार व नातेवाईक यांनी महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व बुद्धम संस्कार कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे समस्त सावंत परिवार सिद्धार्थ नगर माळशिरस यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Поиск в гугле