उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी डबघाईला आलेल्या साखर सम्राटांमध्ये “ग्यानबाची मेखं” मारली होती.
भाजपमध्ये राजकीय आसरा घेतलेल्या नेत्यांचा देव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी साखर सम्राटांची मेखं काढली.
पुणे (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील डबघाईला आलेल्या साखर सम्राटांना कारखान्याला आर्थिक मदत देत असताना “ग्यानबाची मेखं” मारलेली होती परंतु, पक्ष बदलून भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय आसरा घेतलेल्या नेत्यांचा देव उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांनी साखर सम्राटांची मेख काढली असल्याची चर्चा सहकार व राजकीय क्षेत्रात चवीने चर्चिली जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार आमदारांसह सरकारमध्ये सामील झालेले आहेत. अजितदादा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद व अर्थ खात्याची जबाबदारी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळात विविध खात्याचा पदभार अनेक वेळा सांभाळलेला आहे. अर्थ खातं सुद्धा त्यांना नवीन नाही. असे सर्व खात्याचे अनुभवी नेते असणारे अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील डबघाईला आलेले साखर सम्राट यांना आर्थिक मदत करीत असतानाच ग्यानबाची मेखं मारलेली होती. समाजामध्ये ग्यानबाची मेख सुप्रसिद्ध आहे. एकदा मारली की सहजासहजी निघत नाही, अशी आख्यायिका आहे.
तशीच परिस्थिती अजितदादा पवार यांनी साखर कारखान्यांना आर्थिक सहाय्य करीत असताना जाचक अटी वाढविलेल्या होत्या. अनेक साखर सम्राट अटी पूर्ण करू शकत नव्हते त्यामुळे त्यांच्या कारखान्याच्या आर्थिक अडचणीत वाढ होत होती. अनेक साखर सम्राट पक्ष बदलून भारतीय जनता पक्षात राजकीय आसरा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांचा राजकीय आश्रय घेऊन भाजपमध्ये आलेले होते. साखर सम्राट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना विनवणी केली. त्याप्रमाणे देवेंद्रजी फडवणीस यांनी अजितदादांनी मारलेल्या ग्यानबाच्या मेखेवर उपाय करून मेख काढून साखर सम्राट यांना दिलासा दिलेला होता.
भविष्यात कारखानदारांकडून वसूल करण्याच्या वेळी मात्र देवेंद्रजी फडवणीस यांना अजितदादा पवार यांनी मारलेली ग्यानबाची मेख बरोबरच होती, अशी म्हणण्याची वेळ येणार असल्याची राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, awesome blog layout! How long have you ever been blogging
for? you make blogging glance easy. The whole look of your
website is great, let alone the content material!
You can see similar here e-commerce
These are genuinely wonderful ideas in regarding blogging.
You have touched some pleasant things here.
Any way keep up wrinting. I saw similar here: Sklep
What a data of un-ambiguity and preserveness of valuable
know-how on the topic of unpredicted emotions. I saw similar here:
Sklep
Greetings I am so thrilled I found your blog,
I really found you by mistake, while I was looking on Yahoo for
something else, Anyhow I am here now and would just like to say many
thanks for a fantastic post and a all round
exciting blog (I also love the theme/design), I don’t have time to read
it all at the minute but I have bookmarked it and also added in your
RSS feeds, so when I have time I will be back to read
more, Please do keep up the fantastic b. I saw similar here: Najlepszy sklep