माळशिरस शहरात “कडक स्पेशल चहाचा” वर्धापन दिन थाटात व उत्साही वातावरणात संपन्न झाला..

माळशिरस पंचक्रोशीसह पंढरपूरचा पांडुरंग व शिखर शिंगणापूरच्या महादेवभक्तांचे उत्साह वाढविण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजेच कडक स्पेशल चहा.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहरात देहू-आळंदी-पुणे-पंढरपूर व अकलूज-म्हसवड रोडवरील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौकामध्ये माळशिरस पंचक्रोशीसह पंढरपूरचा पांडुरंग व शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव भाविकभक्तांचे उत्साह वाढविण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कडक स्पेशल चहा आहे. माळशिरस नगरपंचायतीच्या शिरपेचामध्ये तुरा रोवून ग्राहकांच्या चटकदार व जिभेला आवडणाऱ्या मनपसंतीला मनावर अधिराज्य करणाऱ्या कडक स्पेशल चहाचा वर्धापन दिन थाटात व उत्साही वातावरणात संपन्न झालेला आहे.
श्री. अनिल नवगण, सौ. प्रतिभा अनिल नवगण, श्री. आकाश अनिल नवगण, सौ. निकिता आकाश नवगण या परिवाराने सुरू केलेल्या कडक स्पेशल चहाच्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट छायाचित्रकार शशिकांत म्हमाने, किरण लोंढे, किशोर नवगण, यशवंत देशमुख, ज्ञानेश शिंदे, नागेश होनराव, जाकीर मौला, मुकेश गोसावी, नाना गुजरे, संतोष मस्के, जाकीर शेख, गणेश देशमुख, उमेश मंजुळे, झाकीर हुसेन शेख, संदीप पवार यांच्यासह असंख्य मित्रपरिवार, नातेवाईक व ग्राहक यांनी दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव केलेला होता.

माळशिरस शहरात ग्राहकांच्या मनावर अधिराज्य करणार्या कडक स्पेशल चहामध्ये सौ. प्रतिभा अनिल नवगण व श्री. आकाश अनिल नवगण या माय लेकरांचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा आहे. श्री. आकाश नवगण यांनी शहराच्या ठिकाणी दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये अनुभव घेऊन चहा बनविण्याची अनोखी पद्धत अवगत केली. त्यांनी आपल्या मातोश्री यांना चहा बनवण्याची पद्धत दाखवून दोघेही चहा बनविण्यामध्ये परिपक्व झालेले आहेत. गेल्या वर्षी कडक स्पेशल चहाला स्वतःच्या जागेमध्ये सुरुवात केलेली होती. नावातच कडक स्पेशल चहा असे असल्याने चवीला सुद्धा तसाच आहे. यामुळे ग्राहकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. एखादा ग्राहक चहा पिल्यानंतर आपल्या नातेवाईक व मित्र परिवारांना आवर्जून व खास करून चहा पिण्याचे सांगत आहेत. दिवसेंदिवस कडक स्पेशल चहाचा बोलबाला माळशिरस पंचक्रोशीत झालेला आहे. कितीतरी लोक अशी आहेत, दिवसातून दोन-तीन वेळा चहा पीत असतात. ते कमीत कमी एक वेळा तरी चहा पिऊन जातात. आळंदी, देहू, शिंगणापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट अशा धार्मिक स्थळांकडे ये-जा करणारे भाविक भक्त आवर्जून कडक स्पेशल चहाचा आस्वाद घेऊन जात असतात. कितीतरी अनेक ग्राहकांची चहा पिण्याची जीभ बदलली मात्र, कडक स्पेशल यांनी आपली चव बदलली नाही. कडक स्पेशल चहामुळे अनेक हॉटेल मालकांचा गारटा झालेला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव देशमुख यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, अर्थ, शिक्षण आदी विभागांसह जगाचा पोशिंदा शेतकरी यांनी सुद्धा कडक स्पेशल चहाचा आस्वाद घेतलेला आहे. वर्षांमध्ये लाखो रुपयाची उलाढाल चहाच्या व्यवसायातून झालेली आहे. नवगण परिवार यांच्या समवेत दिव्या फोटोग्राफीचे उत्कृष्ट छायाचित्रकार शशिकांत म्हमाने यांचा सुद्धा फोटोचा व्यवसाय तेजीत चालू आहे. शेजारधर्माला गुण्यागोविंदाने नांदत आहेत. कडक स्पेशल चहाला व दिव्या फोटोग्राफी यांना बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचे कडून लाख लाख शुभेच्छा… पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.