देशमुखवाडी येथील सौ. अनुसया श्रीरंग सस्ते यांचे दुःखद निधन.

देशमुखवाडी (बारामती झटका)
देशमुखवाडी ता. माळशिरस येथील सुसंस्कृत व सोज्वळ स्वभावाच्या धार्मिक वृत्तीच्या असणाऱ्या सौ. अनुसया श्रीरंग सस्ते यांचे शुक्रवार दि. 17/11/2023 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्याच्या पश्चात पती श्रीरंग अण्णा सस्ते, दोन मुले दत्तात्रय व रमेश, दोन मुली मंदाकिनी सदाशिव कदम व लीलावती लक्ष्मण सावंत, दोन सुना वैशाली दत्तात्रय सस्ते व रूपाली रमेश सस्ते यांच्यासह नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर देशमुखवाडी येथील वैकुंठस्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.
स्वर्गीय सौ. अनुसया सस्ते धार्मिक वृत्तीच्या होत्या. नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या सुखदुःखामध्ये त्या कायम सहभागी होत असत. अशा सर्वगुण संपन्न असणाऱ्या सौ. अनुसया यांना मरण सुद्धा सौभाग्य आलेले आहे. त्यांच्या दुःखद निधनाने सस्ते परिवार यांच्यावर डोंगर कोसळलेला आहे. त्यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि सौ. अनुसया यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

देशमुखवाडी येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे रक्षा विसर्जन (तिसऱ्याचा कार्यक्रम) रविवार दि. 19/11/2023 रोजी सकाळी 08 वाजता होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Normally I do not read article on blogs, however I would like to say that this write-up very forced me to try and do so! Your writing style has been amazed me. Thanks, quite great post.
Wonderful beat ! I wish to apprentice while you amend your web site, how could i subscribe for a blog web site? The account aided me a acceptable deal. I had been a little bit acquainted of this your broadcast provided bright clear idea