ताज्या बातम्या

संजय पाटील घाटणेकर यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर यांनी घेतली.

कुर्डूवाडी (बारामती झटका)

बळीराजा शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेतकऱ्यांचे नेते संजय पाटील घाटणेकर यांचे बंधू घाटणे गावचे माजी सरपंच राजकुमार पाटील यांच्या दुःखद निधनाने पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर यांनी सांत्वन पर भेट घेतली. यावेळी डॉ. सचिन शेंडगे, ज्येष्ठ नेते दादासाहेब काळे, प्रदीप ठवरे पाटील, दादासाहेब वाघंबरे, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी उपस्थित होते.

संजय पाटील घाटणेकर यांच्या राजकीय जीवनामध्ये राजकुमार पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी संजय पाटील यांनी आवाज उठवलेला आहे. खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम संजय पाटील घाटणेकर यांनी केलेले आहे. सुरुवातीस अजितभैया बोरकर यांनी शेतकरी संघटनेत बळीराजा शेतकरी संघटनेत सुरुवात केलेली होती. खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला ताकद संजय पाटील घाटणेकर घेत होते.

सध्या अजितभैया बोरकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहेत. खऱ्या अर्थाने संघटनेपेक्षा चळवळीमध्ये असणारी मैत्री पाटील आणि बोरकर यांची आहे. राजकुमार पाटील यांच्या दुःखद निधनाने पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अशावेळी पाटील परिवार यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट घेऊन मैत्रीचे खरे नाते याची जाणीव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button