चि. सौ. कां. साक्षी सुज्ञे, सदाशिवनगर आणि चि. ओंकार ढवळसकर, बावडा यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…
प्रेषक – श्री. जगदीश भारत राजमाने (मामा), माळशिरस तालुका केमिस्ट आणि ड्रगिष्ट असोसिएशनचे सहसचिव
चि. साईराज सुभाष सुज्ञे
सदाशिवनगर (बारामती झटका)
स्वर्गीय विठ्ठल पांडुरंग सुज्ञे यांची नात व श्री. सुभाष विठ्ठल सुज्ञे उर्फ हरी ओम रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. साक्षी सुज्ञे आणि स्वर्गीय महादेव गणपत ढवळसकर यांचे नातू व श्री. संजय महादेव ढवळसकर रा. बावडा, ता. इंदापूर यांचे कनिष्ठ चिरंजीव ओंकार ढवळसकर यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दि. 29/2/2024 दुपारी 12 वाजून 46 मिनिटे या शुभ मुहूर्तावर लवकुश मंगल कार्यालय मु. पो. बावडा वालचंदनगर रोड, ता. इंदापूर जि. पुणे येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सहसचिव श्री. जगदीश भारत राजमाने (मामा) व चिरंजीव साईराज सुभाष सुज्ञे यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
अग्नि नारायणाच्या साक्षीने, रेशमाच्या बंधनात, वाद्याच्या गजरात, सनईच्या मधुर सुरात संपन्न होत आहे. सहजीवन साथी होत आहेत, अशा पवित्र मंगल क्षणी शुभ आशीर्वादाची उधळण करून सहपरिवार सहकुटुंब उपस्थितीचा लाभ घ्यावा, यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण आहे. लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे नजरचुकीने विसरून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे श्री. सुभाष विठ्ठल सुज्ञे उर्फ हरी ओम आणि समस्त सिडनी परिवार सदाशिवनगर यांनी नम्र आवाहन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Excellent content! The clarity and depth of your explanation are commendable. For a deeper dive, check out this resource: EXPLORE FURTHER. What do you all think?