कृषिवार्ताताज्या बातम्या
शेतकऱ्यांचा सिबिल न तपासता कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी – आ. रामभाऊ सातपुते
मुंबई (बारामती झटका)
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आ. रामभाऊ सातपुते यांनी सरकारचे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांचा सिबिल स्कोर न तपासता कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी बांधव शेतीसाठी किंवा जोडधंदा सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत कर्ज मागायला जातो, तेव्हा त्याला सिबिल स्कोरच्या नावाखाली कर्ज नाकारले जाते. अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहावं आणि शासकीय बँकांनी सिबिल न तपासता शेतकऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी कार्यसम्राट रामभाऊ सातपुते यांनी विधानसभेत आवाज उठवला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further reading, check out this link: READ MORE. Let’s discuss!
This article was a fantastic blend of information and entertainment. It really got me thinking. Let’s discuss further. Click on my nickname for more thought-provoking content!
u3cfrt