महाराष्ट्रातील युवा आयकॉन श्री. सागर (भैय्या) दोलत्तडे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.

माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यातील खुडूस गावचे भूषण म्हणून ओळखले जाणारे आणि अलीकडे महाराष्ट्रात युवा आयकॉन म्हणून नावरूपास आलेले श्री. सागर (भैय्या) दोलत्तडे यांच्या व्यापक सामाजिक कार्याची दखल घेऊन तसेच त्यांची अष्टपैलू नेतृत्व क्षमता ओळखून भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जैन प्रकोष्ठचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश एस. बाफना यांनी श्री. सागर (भैय्या) दोलत्तडे यांना पक्षात येण्यास प्रेरित केले.
मा. श्री. प्रकाश एस. बाफना यांच्या विनंतीला मान देऊन तसेच भविष्यात नागरिकांना सर्वांगीण सुविधा उपलब्ध करून देता याव्या, लोकोपयोगी प्रकल्प राबवता यावेत, जनता दरबार संकल्पना राबवून जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे शेकडो प्रश्न सोडविता यावेत, मोठ्या स्तरावर जनसेवा करता यावी, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देता यावा, तरुणांमध्ये नेतृत्व जागृत करता यावे, यासाठी श्री. सागर (भैय्या) दोलत्तडे यांनी या ६ महिन्यात हजारो तरुणांना घेऊन जाहीर पक्ष प्रवेश करण्याचा मानस बोलून दाखवला. त्यानुसार श्री. बाफना यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत मुंबई येथील भाजपा कार्यालयासमोर प्राथमिक पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री. प्रकाश बाफना आणि भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा मा. सौ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लोकमान्य टिळक यांचे पणतू मा. कुणाल टिळक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मा. श्री. सागर (भैय्या) दोलत्तडे यांनी महाराष्ट्रातील विविध भागातील ७२ कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, मा. जगतप्रकाश नड्डा साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा आदर्श घेऊन आणि त्यांच्या सर्वसमावेशक अजेंड्याला खंबीर पाठबळ देणार असल्याची तसेच भविष्यात हजारो तरुणांमध्ये नेतृत्व घडवून आणण्याची आणि त्यांना पक्षात आणण्याची भीष्मप्रतिज्ञा श्री. सागर (भैय्या) दोलत्तडे यांनी केली.

सदर कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी सागर दोलत्तडे यांस शेकडो जनतेसमक्ष विशेष शुभेच्छा दिल्या. तसेच न भूतो न भविष्यती या म्हणीप्रमाणे पहिल्याच भेटीत भाजपामध्ये योग्य पदभार देण्याचे देखील जाहीर केले. श्री. बावन्नकुळे यांनी विशेष दखल घेतल्याचे लक्षात येताच उपस्थित कार्यकत्यांच्या आणि नागरिकांच्या “सागरभैय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है|” च्या नाऱ्यांनी भाजपा कार्यालयातील अवघा परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचा समारोप घेताना श्री. सागर (भैय्या) दोलत्तडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे विशेष आभार व्यक्त केले. छोट्या सामाजिक कार्यापासून ते विधायक कार्याच्या दिशेने जाणाऱ्या आपल्या वाटचालीत आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत अशी भावना श्री. प्रकाश बाफना यांनी व्यक्त केली. श्री. सागरभैय्या यांना भविष्यात राज्यस्तरीय सुवर्णसंधी चालून येतील इतके प्रभावी व्यक्तीमत्व असल्याची चर्चा या कार्यक्रमामध्ये चालू होती.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.