चि. सौ. कां. प्रसादिता उरवणे, सदाशिवनगर आणि चि. अक्षय वालेकर, चिंधवली यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. सुहास उरवणे, सदाशिवनगर व श्री. अशोक वालेकर, चिंधवली यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार
प्रेषक – सागर जयराम उरवणे अध्यक्ष, वीरशैव लिंगायत समाज संघटना, सदाशिवनगर यांच्यावतीने आग्रहाचे निमंत्रण
सदाशिवनगर (बारामती झटका)
सौ. भाग्यश्री व श्री. सुहास जयराम उरवणे रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस, यांची सुकन्या चि. सौ. कां. प्रसादिता आणि सौ. संगीता व श्री. अशोक पांडुरंग वालेकर रा. चिंधवली, ता. वाई, यांचे सुपुत्र चि. अक्षय यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. १/४/२०२४ रोजी दु. १२ वा. ४३ मि. या शुभमुहूर्तावर सौभाग्य मंगल कार्यालय, अकलूज-माळीनगर रोड, पेट्रोल पंपासमोर माळीनगर, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधूर मिलन, सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात, नवजीवनात केलेले पदार्पण यासाठी हवा शुभाशीर्वाद व शुभेच्छांची सुखद रम्य पाखरण, म्हणूनच या शुभ विवाहाचे आग्रहाचे व अगत्याचे निमंत्रण उरवणे व वालेकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.