खुडूस गावचे डॉ. विक्रम महादेव ठवरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन…

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक नामदेवआप्पा ठवरे पाटील यांचे पुतणे होते.
खुडूस (बारामती झटका)
खुडूस ता. माळशिरस, येथील डॉक्टर विक्रम महादेव ठवरे यांचे शनिवार दि. 30/03/2024 रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन सख्खे भाऊ, चुलते, चुलती, तीन चुलत बंधू असा परिवार आहे. त्यांच्यावर खुडूस येथील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात रविवार दि. 31/03/2024 रोजी सकाळी नऊ वाजता अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांच्या रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम सोमवार दि. 01/04/2024 रोजी सकाळी सात वाजता होणार आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक नामदेवआप्पा ठवरे व महादेवराव ठवरे दोघे बंधू होते. महादेवराव ठवरे यशवंत नगर येथील स्मृती भवन शेजारी वास्तव्यास होते. दोन्ही बंधू नामांकित पैलवान. त्यांनी आपल्या सहाही मुलांना पैलवान केलेले आहे. पैलवानकी करत शिक्षण घेतलेले आहे. काही वर्षांपूर्वी महादेवराव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले होते. नामदेवआप्पा ठवरे यांच्यावर दोन्ही कुटुंबाची जबाबदारी आलेली होती. डॉक्टर विक्रम यांचे लग्न होऊन अजून वर्ष सुद्धा झालेले नाही, अशा कमी वयामध्ये हृदयविकाराचा तिव्र झटका येऊन दुःखद निधन झालेले आहे.
ठवरे परिवार व खुडूस पंचक्रोशीवर दुःखाची शोककळा पसरलेली आहे. स्वर्गीय डॉक्टर विक्रम ठवरे यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व ठवरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.