चिरंजीव कृष्णराज विक्रमसिंह कदम पाटील याचे दुःखद निधन…

अकलूज (बारामती झटका)
स्वरूपनगर, यशवंतनगर ता. माळशिरस येथील सेवानिवृत्त शिक्षक फत्तेसिंह शंकरराव कदम पाटील यांचे नातू चिरंजीव कृष्णराज विक्रमसिंह कदम पाटील (वय दीड वर्ष) याचे अल्पशा आजाराने आज दि. 10/04/2024 रोजी दुपारी दुःखद निधन झालेले आहे. कृष्णराज यांच्या पश्चात आजोबा, आई, बाबा, मोठा भाऊ, चुलता, चुलती, दोन चुलत बंधू असा परिवार आहे.
सेवानिवृत्त शिक्षक फत्तेसिंह कदम पाटील यांना वैभव आणि विक्रमसिंह असे दोन मुले आहेत. त्यापैकी विक्रमसिंह यांचा लहान मुलगा कृष्णराज. याला दोन दिवस किरकोळ ताप आलेला होता. अचानक तापाची तीव्रता वाढली आणि त्याने अखेरचा श्वास घेतलेला आहे. लहान मुल असल्याने दफन विधी सायंकाळी 7.30 वाजता अकलाई स्मशानभूमी शेजारील लिंगायत दफनभूमी येथे होणार आहे.
कदम पाटील यांचे मूळ गाव मळोली आहे. मळोली तांदळवाडी, घुमेरा वेळापूर या गावावर दुःखाची शोककळा कोसळलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.