माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न होणार – अध्यक्ष शिवाजीराव देशमुख.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते सुरेशआबा पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न होणार.
माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निवडणूकीची रणनीती ठरविण्याच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटक पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या आदेशाने व सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते सुरेश आबा पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश, जिल्हा, तालुका कार्यकारणी सदस्य तसेच विविध फ्रंटलचे पदाधिकारी यांची माढा लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये शनिवार दि. २०/४/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता विचार विनिमयाची व भविष्यातील निवडणुकीची राजकीय समीकरणे व ध्येयधोरण ठरविण्याची बैठक आयोजित केलेली आहे.
तरी सर्वांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी आवाहन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.