नातेपुते येथे ह. भ. प. चंद्रकांत दादा काळे यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथे ह. भ. प. श्री. चंद्रकांत दादा तुकाराम काळे यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि. २३/४/२०२४ रोजी काळे मळा, पिरळे रोड, नातेपुते येथे करण्यात आले आहे.
या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त काळे परिवाराच्या घरी २५ तास अखंड रामनाम जप यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे. त्यामध्ये पहाटे ५.३० वाजता ‘श्री’ नां अभिषेक व काकड आरती, दुपारी १२ वा. महानैवेद्य व महाआरती, सायंकाळी ६ ते ७.३० ह. भ. प. श्री. धैर्यशील भाऊ देशमुख कार्याध्यक्ष, चैतन्य जप प्रकल्प महाराष्ट्र राज्य, यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता ह. भ. प. श्री. चंद्रकांतदादा तुकाराम काळे यांची ग्रंथतुला होणार आहे. रात्री ८ वा. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आरती व सत्संग होणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सुधीर चंद्रकांत काळे, वैभव हणमंतराव काळे, संतोष चंद्रकांत काळे (चेअरमन, बळीराजा ग्रामीण (बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित) नातेपुते व व्हाईस नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.