चि. शिवतेज उर्फ विशाल कदम, कदमवाडी आणि चि. सौ. कां. छाया उर्फ शिवंक्षा जाधव, उंडवडी यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. अनंतराव दिनकर कदम, कदमवाडी आणि श्री. लक्ष्मण सोपान जाधव, उंडवडी यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार
कदमवाडी (बारामती झटका)
श्री. अनंतराव दिनकर कदम रा. कदमवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे सुपुत्र चिरंजीव शिवतेज उर्फ विशाल आणि श्री. लक्ष्मण सोपान जाधव रा. उंडवडी, ता. बारामती, जि. पुणे यांची सुकन्या चि. सौ. कां. छाया उर्फ शिवंक्षा यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. २८ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटे या गोरज शुभ मुहूर्तावर मधुर मिलन सांस्कृतिक भवन, पुणे पंढरपूर रोड, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे. तरी या शाही शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कदम व जाधव परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन कदम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.