केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री खा. मुरलीधरजी मोहोळ यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांची जोरदार तयारी

पुणे (बारामती झटका)
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांचा पुणे दौरा जाहीर झाला आहे. यामध्ये खासदार मुरलीधरजी मोहोळ यांचे शनिवार दि. १५ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता भाजपा शहर कार्यालय डीपी रोड येथे तर, दुपारी ४.३० वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्याशी पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता शुभारंभ लॉन्स येथे नागरिकांच्या भेटीगाठी असणार आहे.

असा नूतन खासदार मुरलीधरजी मोहोळ यांचा पुणे दौरा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्याच्या तयारीला कार्यकर्त्यांनी जोरदार सुरुवात केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.