ताज्या बातम्या
दिगंबर उर्फ बाबासाहेब शेटे यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन

बार्शी (बारामती झटका)
बार्शी येथील रहिवासी दिगंबर उर्फ बाबासाहेब शेटे (वय ८४ ) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले. ते काॅंग्रेसचे माजी कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, पुतण्या असा परिवार आहे.
दिगंबर उर्फ बाबासाहेब शेटे गेली काही वर्षांपासून पुण्यात मुलाकडे वास्तव्यास होते. नुकतेच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने शेटे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर दिगंबर उर्फ बाबासाहेब शेटे यांच्या आत्म्याला शांती देवो आणि शेटे परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.