ऐन पेरणीच्यावेळी लिंकिंग खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासाठी खत विक्रेत्यांचा तगादा
अडवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधावा – नितीन चव्हाण कृषी अधिकारी
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात गेले दोन तीन दिवस पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीस तयारीला लागला आहे. सध्या खरीप हंगामासाठी मका, बाजरी, तूर या पिकास पेरणीबरोबर खत द्यावे लागते. सध्या शेतकऱ्यांना मका, कडवळ या चारा पिकासाठी युरियाची अत्यंत गरज आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून युरिया खताबरोबर इतर खते घेतली तरच युरिया खत मिळत आहे. खत विक्रेत्यांनी लिंकिंग खते शेतकऱ्यांच्या पदरात घालण्यास सुरुवात केली असून त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे. यावर्षी अनेक वर्षात प्रथमच रोहिणी व मृगाचा पाऊस वेळेवर झाल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या लगबगीत आहे. बी-बियाणे, खते घेण्याच्या तयारीत आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे बाजारात खते, बी-बियाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी रासायनिक खते विशेषतः युरियाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना १०:२६:२६ किंवा १८:४६ सारखी महागडी किंवा आत्ता गरज नसलेली अशी खते लिंकिंग ने घ्यावी लागत आहेत. त्याशिवाय एक दोन पोतीही युरिया मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
तालुक्यात नातेपुते, माळशिरस, पिलीव, अकलूज, वेळापूर अशा मोठ्या बाजारपेठा असूनही सगळीकडेच युरियाची मोठी टंचाई निर्माण झालेली दिसत आहे. सध्या पाऊस झाल्याने खरीप पेरणी बरोबरच मका, कडवळ अशी चारा पिके व उसाच्या खोडव्यासाठी शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत गरज असताना व्यापाऱ्यांकडून लिंकिंगची खते माथी मारली जात आहेत.
कंपन्यांकडून लिंकिंग केले जात आहे
आम्हाला खत कंपन्यांकडूनच युरिया खताचा कमी पुरवठा होत असून त्यासोबत लिंकिंगची खते दिली जात आहेत. कंपन्याच लिंकिंग करत असल्याने आम्हाला नाईलाजाने पुढे तसेच विकावे लागत आहे. इकडे कंपन्या लिंकिंग करत आहेत, तर दुसरीकडे कृषी अधिकारी शेतकऱ्यांना युरिया देण्याबाबत सांगत असल्याने आम्ही अडचणीत सापडलो आहोत, असे रासायनिक खताचे विक्रेत्यांनी सांगितले
अनावश्यक खते घेऊन काय करायचे ?
आम्हाला सध्या बाजऱ्या पेरणीसाठी युरियाची गरज असताना व्यापारी १०:२६:२६ किंवा १८:४६ अशी महागडी खते आज गरज नसताना घ्यायला भाग पाडत आहेत. सध्या बी बियाण्यांना पैसे नसताना हा भुर्दंड सोसावा लागत आहे. काही ठिकाणी युरिया बरोबर मका बी पिशवी घेण्याचे कंपल्शन केले जात आहे. शासनाने यात लक्ष घालून आम्हाला जे पाहिजे ते खत उपलब्ध करून द्यावे. – गोरख विठोबा मगर, शेतकरी, निमगाव
अडवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधावा
सध्या पाऊस चांगला झाला असल्याने शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी रासायनिक खतांची विशेषतः युरियाची गरज पडत आहे. मात्र त्यांची व्यापाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्याने आम्ही खत विक्रेत्यांना व खत कंपन्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कुणा शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल तर माझ्या मो. नं. ९८८१५६३१७८ वर संपर्क साधावा. नितीन चव्हाण कृषी अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
pin up onlayn kazino https://azerbaijancuisine.com/# pin-up online casino
pin-up 306
http://northern-doctors.org/# pharmacies in mexico that ship to usa
mexico pharmacy: Mexico pharmacy that ship to usa – mexican pharmacy
https://northern-doctors.org/# mexico pharmacy
mexican drugstore online: mexican pharmacy online – mexican border pharmacies shipping to usa
http://northern-doctors.org/# purple pharmacy mexico price list
buying prescription drugs in mexico: northern doctors pharmacy – pharmacies in mexico that ship to usa